Home क्राईम रेल्वेस्थानकावर अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

रेल्वेस्थानकावर अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे आवाहन

0
100

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर एका ५० वर्षीय अनोळखी इसमाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, रेल्वे पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर बुधवार २० मे २०२६ रोजी जवळ एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी तातडीने त्या इसमाला पुढील उपचारार्थ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान मयताची कोणतीही ओळख पटलेली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी ओळख पटवावी असे आवाहन रेल्वे पोलीसांकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound