जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात यावल नगर परिषदेकडून अव्वल प्रदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४ याचे आयोजन दिनांक २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. या महोत्सवा दरम्यान दिनांक 30 डिसेंबर 2024 एकलव्य क्रीडा संकुल जळगाव येथे कीबोर्ड, हॉलीबॉल ,बॅडमिंटन व असे खेळांचे आयोजित करण्यात आले होते व दिनांक ३१ रोजी १०० मी २०० मी ४०० मी तीन किमी चालणे स्पर्धा गोळा फेक या खेळांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व खेळांमध्ये यावल नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे अव्वल तर त्याचे प्रदर्षण दिसून आले.

दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी बॅडमिंटन या खेळात पुरुषांमध्ये यावल परिषदेचे लिपिक कामील शेख यांनी तिसरा क्रमांक पटकावला तर महिलांमध्ये यावल नगरपरिषदेच्या नगररचना विभाग प्रमुख नुपूर फालक यांनी दुसरा क्रमांक पटकावला. बरोबर३१ डिसेंबर रोजी आयोजित खेळांमध्ये यावल नगर परिषदेच्या नगररचना विभाग प्रमुख नुपूर फालक यांनी १०० मीटर चालणे या खेळात पहिला क्रमांक व व गोळा फेक मध्ये २ रा क्रमांक पटकावला, त्याचबरोबर नगरपरिषदेचे कर निरीक्षक अनिकेत कर्डिले यांनी १०० मीटर व ४०० मी. धावणे यात प्रथम क्रमांक पटकावला व लिपिक कामील शेख यांनी 3 कि.मी धावणे या खेळात दुसरा क्रमांक पटकावला.

Protected Content