यावल येथे टोकरे कोळी समाज बांधवांची उद्या बैठक

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांची शेगाव येथे ७ नोव्हेंबर येथे लोकनेते  डॉ.दशरथ भांडे नेतृत्वात होत आहे. या अनुषंगाने यावल शहरात उद्या ३ नोव्हेबर रोजी टोकरे कोळी समाज बांधवांची महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला समाजाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते प्रभाकर सोनवणे हे संबोधित करणार आहे. यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. तालुक्यातुन सर्व आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांनी या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाला जालंदर कोळी (तालुकाध्यक्ष आ.सं.समीती ), संदीप सोनवणे (जळगाव जिल्हा सदस्य आ.सं.समीती), भरत कोळी, बामणोदचे सरपंच राहुल तायडे, भालोदचे सरपंच प्रदिप कोळी, अंजाळा येथील सरपंच यशवंत सपकाळे, कोळ न्हावी सरपंच गोटू सोळुंके, पाडळसेचे सरपंच खेमचंद कोळी, सर्वश्री सरपंच भालशिव पिंप्री, पिंपरूड, लिधूरी, दूसखेडा, डांभुर्णी, डोनगाव याबरोबर समाजाचे तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य व समाजातील सर्व विविध संघटनेत असलेले पदाधिकारी यांच्या वतीने समाज बांधवांना करण्यात आले आहे.

 

Protected Content