जळगावातील या हॉटेल्समध्ये मिळणार ‘पार्सल’ !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गरजू नागरिकांसाठी आठ हॉटेलांना फक्त पार्सल सुविधा वितरित करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली असून याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिनांक ३१ मार्च पर्यंत शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स रेस्टॉरंट खानावळ ठिकाणे गर्दी होऊ नये म्हणून बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यात अनेक गरजूंना हॉटेल वा खानावळींमधून भोजप मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. दरम्यान उपाय योजनांचा भाग म्हणून शहरातील आठ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट यांना केवळ पार्सलची सुविधा वितरित करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांनी दिली आहे. या परवानगी देण्यात आलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मधून नागरिकांना केवळ फुड पार्सल नेता येणार आहे. याठिकाणी गर्दी होऊ नये याची जबाबदारी संबंधित हॉटेल चालक व मालक यांनी घ्यावयाची आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

असे आहेत आठ हॉटेल

जिल्हाधिकार्‍यांनी हॉटेल सिल्वर पॅलेस, होटेल मुरली मनोहर, हॉटेल शालीमार, हॉटेल गौरव, हॉटेल जलसा, हॉटेल रसिका मुरलीमनोहर रेस्टॉरंट, हॉटेल उत्तम भोज अशा आठ ठिकाणाहून फुड पार्सल नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे.

वासूज मेजवानीतही सुविधा

दरम्यान, हॉटेल वासूज मेजवानी येथे तैनातीत असणारे सरकारी, निमशासकीय कर्मचार्‍यांना आणि वैद्यकीय, पॅरामेडिकल सर्व्हिसेस आणि रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णांसाठी मोफत फूड पॅकेट्स देण्याचे ठरविले आहे. गरजूंनी चार तास आधी त्यांच्या पत्यासह मोबाईल नंबर कळविल्यास संबंधीत व्यक्तीच्या पत्त्यावर अन्नाचे पाकिटे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात ८७८८४७९४४७; ९४२२७७५०७४ आणि ९४०३३९९९९४ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकतात दुपारी १२ ते २ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत पॅकेटचे वितरण करण्यात येणार आहे.

Protected Content