वॉटरग्रेसच्या वाहनांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आढळली कचर्‍याऐवजी झुडपे (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । वॉटरग्रेस कंपनीतर्फे कचरा संकलनासाठी लावण्यात येणार्‍या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांमध्ये कचर्‍याऐवजी तोडलेली झुडपे असल्याचा प्रकार शनिवारी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी उघडकीस आणला होता. आज पुन्हा आज आव्हाणे शिवारातील कचरा फ़ॅक्टरीत हा प्रकार घड झाला असून श्री. पाटील यांनी आयुक्तांनी वॉटरग्रेस कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

काल शनिवारी अभिषेक पाटील यांना कचरा संकलन करणाऱ्या वाहनातून कचऱ्याऐवजी तोडलेली झुडपे, माती मिश्रित कचरा, माती आढळून आली होती. हीबाब त्यांनी आयुक्तनाच्या निदर्शनास आणून दिली असता आयुक्तांनी कारवाईच्या आश्वासन दिले होते. मात्र, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सलग दुसऱ्या दिवशी वॉटरग्रेस कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये कचऱ्याऐवजी आजपुन्हा मोठ्या प्रमाणावर माती, दगडे आढळुन आले आहे.

महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील नेमाडे, अँड .कुणाल पवार, गणेश निंबाळकर, विजय पाटील यांनी रविवारी पुन्हा अ‍ाव्हाणे येथे कचरा फॅक्टरीत जावुन पाहणी केली असता प्रकार समोर आला. राष्ट्रवादी कॉग्रेसने या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला असून कारवाईसाठी आव्हान देणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीवर आता तरी आयुक्तांनी कठोर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन केले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/336670110869227/

Protected Content