चोपडा येथे ‘माझी वसुंधरा अभियान’

चोपडा प्रतिनिधी । पर्यावणाचे संतुलन राखण्याबरोबरच त्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान हाती घेतले आहे. चोपडा नगरपरिषदेत या अभियानाला सुरुवात झाली असून, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे शहरात हे अभियान राबविले जाणार आहे.

अलिकडे शहरच नव्हे तर गावांचा देखील झपाट्याने विस्तार वाढू लागला आहे. हे होत असताना तेथील पर्यावरणाचे संतुलन राखणे तितकेच गरजेचे आहे. याच उद्देशाने राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान” हाती घेतले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच काही निवडक गावांमध्ये या अभियानाला सुरूवात झाली असून, चोपडा नगरपरिषदेने देखील  पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. या अभियामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वाच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या पंचतत्त्वानुसार नदीसंवर्धन,जैवविविधता तत्वानुसार स्थळ आणि प्रकाश या कामांचे मुल्यांकन केले जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीदिनापासून हे अभियान सुरु झाले आहे. 

पृथ्वी पंचतत्त्वानुसार गावातील ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे,  सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्य्वस्थापन आणि जमिनीचे धुपीकरण ही कामे केली जाणार आहेत. तर जल पंचतत्वानुसार नदीसंवर्धन, जैवविविधता जतन करणे, जलस्त्रोतांचे संरक्षण व संवर्धन आणि नदीकिनाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे. अग्नी तत्वानुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे, त्याचा अपव्यय टाळून, त्यात बचत करणे, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. आकाश तत्वानुसार  स्थळ आणि प्रकाश या स्वरुपात मानवी स्वभावातील बदलांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्याक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे.

शासनाकडून गौरव – माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपरिषदाचा व पालिकांचा शासनाकडून गौरव केला जाणार आहे. 1500 गुणांचे हे अभियान असणार आहे. पृथ्वी 600, वायू 100 गुण, जल 400, अम्नी 100 गुण तर आकाश 300 असे एकूण 1500 गुण या अभियानासाठी आहेत.

 

 

 

Protected Content