लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची जयंतीनिमित्त अभिवादन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात  राष्ट्रीय सन उत्सव समिती तर्फे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. प्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यअर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी तरुण अवस्थेतच  राजकारणात आपली चुणूक दाखवित महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय दिशादर्शक असे कार्य केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात शिक्षण, वित्त, नियोजन, महसूल, पाटबंधारे, ऊर्जा, वण  आरोग्य, नगरविकास व सांस्कृतिक कार्य विभाग अस्या अनेक विभांच्या माध्यमातुन बालभारती ची स्थापना, एक सूर एक ताल, सातपुडा विकास, आदिवासी विकास, सिंचन प्रकल्प विकास, डोक्यावरून मैला वाहण्यावर बंदी, श्वेत पत्रिका, अशी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. 1990 ते 1995  विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच  हिंदी भाषेचा विकास झाला, हिंदी भाषेला विश्वभाषे चा दर्जा मिळावा यासाठी ‘युनो’ या आंतरराष्ट्रीय संस्थेत पाठपुरावा करून प्रस्ताव सादर करण्यात आला. जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर असलेल्या नेतृत्वाचा सन्मान म्हणुन आज त्यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

 

प्रसंगी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते धनंजयभाऊ चौधरी, तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष एस.के.चौधरी, चेअरमन लीलाधरशेठ चौधरी, संस्थेचे पदाधिकारी नंदकुमार भंगाळे, एम.टी. फिरके, के.आर. चौधरी, संजय चौधरी प्राचार्य  डॉ.पी.आर.चौधरी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी  राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख डॉ.एस.एल. बिऱ्हाडे, लेप्ट.डॉ.राजेंद्र राजपूत, शेरसिंग पाडवी, राजेंद्र तायडे,ललित पाटील, प्रमोद अजलसोंडे, पवन अजलसोंडे, शेखर महाजन, नितीन सपकाळे, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Protected Content