रावेर तालुक्यातील वीस गावांना पाणी टंचाईचे भीषण सावट

raver

रावेर (प्रतिनिधी)। पाणीदार रावेर तालुक्यात 13 कोटीची जलयुक्त शिवार योजनेचे कामे होवून सुध्दा आदिवासी भागातील 8 तर इतर 12 गावे पुढील महिनाभरात संभाव्य पाणी टंचाईच्या धोकादायक स्थितीत आले आहे. पुढील महीनाभरात या 20 गावांना काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

या गावांना ट्यूबवेल, विहीर अधिग्रहण, विंध्यन विहीरी मंजूर करण्यासाठी पंचायत समितीकडून जिल्हा परीषदकडे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवण्यात आले आहे.  मागील वर्ष सोडले तर तालुक्यात सरासरी पाऊस होऊन सुध्दा जलयुक्त शिवार योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाण्याची पातळी प्रचंडघट होत आहे. पुढील महीनाभरात 20 व त्यापेक्षा अधिक गावे पाणीटंचाईच्या डेंजर झोन येण्याची शक्यता गृहीत धरुन ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समितीतर्फे आधीच खबरदारी घेत विस गावांना ट्यूबवेल, विहिरी, विहीर अधिगृहित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासना कडे प्रस्ताव पाठविले आहे

या गावांचे दिले आहे प्रस्ताव
सर्वाधिक करोडो रूपयाची जलयुक्त शिवार योजनेचे कामे झालेल्या आदिवासी भागातील पिंपरकुंड-निमड्या, पाडळे बु, सायबुपाड्या-निमड्या, जूनोने, विश्राम-जिन्सी, मोरव्हाल, जानोरी-तांडावस्ती ही गावे संभाव्य पाणी टंचाईने ग्रस्त असुन इतर खिरोदा प्र या, थेरोळे, थोरव्हान, पातोंडी, चोरवड, निबोल, रमजीपुर, सिंगनूर, गोलवाडे, खिरवड, भातखडे गावे असुन यांचे मंजूरीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवले आहे.

Add Comment

Protected Content