मस्करी करणे भोवले; चौघांकडून तरूणाला बेदम मारहाण !

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात मस्करी केल्याच्या कारणावरून एका तरुणाला चार जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता घडली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांनी विरोधात रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

समाधान दशरथ जोगी वय १८, रा. दहिवद तालुका अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गावातील शनी मंदिराच्या जवळ उभा असताना त्याने गावातील काही जणांची मस्करी केली. या मस्करी केल्याच्या रागातून गावात राहणारे करण अण्णा भील, रोशन बापू भील, समाधान बापू भील, आणि मुकेश राजू भील, सर्व रा.दहिवद ता. अमळनेर या चार जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये समाधान हा गंभीर जखमी झाला. दरम्यान या घटनेसंदर्भात रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे संशयित आरोपी करण अण्णा भील, रोशन बापू भील, समाधान बापू भील, आणि मुकेश राजू भील, सर्व रा.दहिवद ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय भोई हे करीत आहे.

Protected Content