अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी आजोबांच्या स्वाधीन; पोलीसांचे कौतूक

यावल प्रतिनिधी । शहरातील धोबीवाडा परिसरातील राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी दीड वर्षांपुर्वी बेपत्ता झाली होती. मात्र अचानकपणे अल्पवयीन मुलीने आजोबांशी संपर्क केला. त्यावरून आजोबांनी पोलीसांकडे हरविल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीसांनी मुलीचा शोध घेवून आजोबांच्या स्वाधीन केले आहे. पोलीसांनी केलेल्या कामगिरीचे परिसरात कौतूक होत आहे.

या संदर्भात यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की,  ट्विंकल किरण कोळी ही यावल येथे आपल्या आईचे वडील आजोबा भिमसिंग गंगाराम कोळी रा . धोबीवाडा यावल यांच्याकडे राहुन शिक्षण घेत असतांना दि. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास तिला शाळेच्या परिसरातुन कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रिक्षात बसवुन घेवुन गेल्याची माहीती शाळेच्या सुत्रांकडुन प्राप्त झाली होती.

दरम्यान, याबाबत ट्विंकल कोळीचे आजोबा भीमसिंग कोळी यांनी आपली नात व तिची आई मनीषा ही सुप्रीम कॉलनीमध्ये जळगाव येथे राहत असल्याने सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुलीकडे जाऊन नातूचा शोध घेतला असून मात्र त्याठिकाणी त्यांची नात  व मुलगी या दोघ ही मिळून आल्या नाहीत नंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील ट्विंकल आणि त्याची आई मनिषा त्या दोघांचा शोध घेतला. मात्र तरी देखील ते मिळून आले नाहीत अखेर भिमसिंग कोळी यांनी आपली नात ही बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. अखेर दीड वर्षानंतर दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता सुमारास अचानक  ट्विंकलचा फोन आला आणि आपण देरवा चौक, बडहलगंज गोरखपूर जिल्हा उत्तरप्रदेश सरकारी दवाखान्याच्या मागे राहत असून असल्याची सविस्तर माहिती ट्विंकल कोळी हिने आपल्या आजोबांना दिली व सांगितले की आपण येथे आपले आई सोबत नवीनसिंग उर्फ गुड्डन रामा शंकरसिंग सोबत राहत असुन, ह्याच व्यक्तीने यावलहुन आपणास रिक्षात बसून उत्तरप्रदेश येथे आणले होते, तेव्हापासून आपण आपल्या आई बरोबर कानपूर येथे राहत होते. परंतु साधारण एक महीन्यांपुर्वी ट्विंकल कोळी हिची आई मनीषा कोळी या महिलेचे कोरोनामुळे दवाखान्यात निधन झाले व त्यानंतर लागलीच सकाळी ४ वाजता ट्विंकल कोळी हिने यावल येथे आपल्या आजोबांशी संपर्क साधून सविस्तर माहिती कळविली. 

या ट्विंकल हिने दिलेल्या या माहितीचा आधार घेउन तात्काळ पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि सहायक फौजदार विजय पाचपोळे या दोन अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करून अल्पवयीन मुलीचे आजोबा भिमसिंग कोळी यांना सोबत घेऊन पथक हे उत्तरप्रदेशकडे रवाना झाले व त्यांनी बडहल गंज पोलिसांच्या सहकार्याने देरवा चौक या गावात जाऊन अखेर त्या मुलीची ओळख तिचे आजोबाने केल्यावर आजोबांचे आवाज ऐकुन ट्विंकल ही आजोबा धावत आली. नंतर पोलीसांनी तिला ताब्यात घेतले व बडहलगंज पोलिस चौकीमध्ये आणले व उत्तरप्रदेश पोलिसांनी कायद्याची पुर्तता करून अखेर हे पथक त्या अल्पवयीन मुलीला घेऊन काल रात्री १२ वाजेच्या सुमारास यावल येथे दाखल झाले. यावल पोलिसांनी ट्विंकल कोळी यांच्या कुटुंबातील इतर मंडळीशी संपर्क साधून तिच्या आजोबासह कुटुंबाच्या स्वाधीन केले. यावेळी ट्विंकल चे आजोबा यांनी यावल पोलिसांचे विशेष आभार मानले आपले नातू आपल्या ताब्यात मिळाली. या आनंदाने त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले या सर्व तपासकार्यात यावल येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या शोधकार्यासाठी  गेलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आभार मानून विशेष कौतुक करण्यात आले आहे. 

Protected Content