सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या

hanging rope

 

अकोला (वृत्तसंस्था) शहरातील शास्त्री स्टेडियम जवळच्या क्रीडा प्रबोधनीत महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते.

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील शास्त्री स्टेडियम जवळच्या क्रीडा प्रबोधनीत प्रणव राऊत थांबलेला होता. आज सकाळी साधारण साडे नऊच्या सुमारस प्रणव रुम मधूनबाहेर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. परंतू अनेक वेळा आवाज देऊन देखील प्रणव दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रणवने गळफास घेतल्याचे दिसल. दरम्यान, प्रणवच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Protected Content