जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील ई-सेक्टरमधील ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीतून अज्ञात तीन चोरट्यांनी कार्यालयात तीन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जिग्नेश शरद शेठ वय-४५ यांची एमआयडीसी सेक्टर ई मध्ये ग्रीन एन इको सोल्युशन नावाची कंपनी आहे. दरम्यान शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीची दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ऑफीसमधील ड्रॉवरतोडून आत ठेवलेले ३ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा सर्व प्रकार कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीला आल्यानंतर कंपनीचे मालक जिग्नेश शरद शेठ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान या संदर्भात सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.