पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्या प्रवीणदीप फाऊंडेशनचा पुढाकार

kolhapur new

जळगाव, प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुर, सांगली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामूळे मोठ्या प्रमाणावर पुरस्थिती निर्माण झालीये. नद्यांना पुर आलायं, गावागावांत पाणी शिरलं, शहरात पुराने हाहाकार माजवलाय अश्यातच अनेक घर बेघर झालीत, जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासू लागला. लोकांना जगण्यासाठी वणवण भटकावे लागतंय. यासाठी जळगाव येथील नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्या प्रवीणदीप फाऊंडेशनने पुढाकार पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातून प्रथमच प्रत्यक्ष पुरग्रस्त भागात जावून मदत करणाच्या संकल्प करणारे फाऊंडेशन म्हणून प्रवीणदीप फाऊंडेशन सहकार्य करणार आहे. कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांच्या मदतीसाठी संपुर्ण महाराष्ट्र धावून येत असतांना खारीचा वाटा म्हणून मदत करण्यासाठी जळगाव शहरातील मनपाचे नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्या प्रवीणदीप फाऊंडेशनतर्फे अशा अनेक जीवनावश्यक वस्तू घेवून दिनांक १७ आँगस्ट ला फाऊंडेशनचे पदाधिकारी कोल्हापुरला रवाना होणार आहेत. एक हात मदतीचा आपलाही त्यात सहभाग  प्रवीणदीप फाऊंडेशन सोबत कोल्हापुर, सांगली येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपणही खारीचा वाटा उचलूयात. सढळ हाताने मदत करुयात, यासाठी प्रवीणदीप फाऊंडेशन सोबत पाठविण्यासाठी आपण वस्तूंची मदत करु शकतात. यात चांगले कपडे, ब्लँकेट, चादर, प्रथमोपचार पेटी, औषधी, कडधान्ये, बिस्कीटे, पाण्याच्या बाटल्या, तेल,कांदे, बटाटे, तांदुळ, मीठ, साखर, खाद्यपदार्थ असे अनेक प्रकारची मदत स्वीकारली जाईल. तसेच कुणाला साहित्याऐवजी आर्थिक मदत करावयाची असल्यास ती सुद्धा स्विकारली जाणार आहे. कोणाला मदत करावयाची असल्यास त्यांनी पुढील कोणत्याही क्रमांकावर संपर्क करावा सदर सदस्य आपल्यापर्यंत येवून ती मदत स्विकारतील. प्रवीण कोल्हे ९६०४०६७७७०, आण्णा सोनवणे ९८५००८७८३५, योगेश पाचपांडे- ९८९०६८४२२५, बबलु साबळे ८९९९३३८५८५, जितु जैन ८३२९०९२५६२,
धनराज पाटील ८४५९५६१४९५, मितेश भदाणे ९४२२२९१५९१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content