चाळीसगाव कोर्टाच्या आवारात लसीकरण सुरू करण्याबाबत निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस गडद होत चालला असून मृत्यूच्या दरात ही वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, वकीलांचे गैरसोय होऊ नये, म्हणून तात्काळ येथील न्यायालयाच्या आवारात देखील ‌लसीकरणाला सुरुवात करण्यात यावी, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना वकील संघाकडून देण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यात लसीचे तुटवडा जाणवू लागल्याने मध्यंतरी लसीकरणात खंड पडला होता. मात्र गुरूवार,६ रोजी चाळीसगाव येथील ट्रामा केअर सेंटरला ५५०० डोस प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लसीकरणाला शुक्रवार पासून सुरूवात करण्यात आली आहे. या लसीकरणात चाळीसगाव न्यायालयातील वकील व न्यायालयीन कर्मचार्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून न्यायालयाच्या आवारात लसीकरणाला सुरूवात करण्यात यावे या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांना चाळीसगाव वकील संघाकडून देण्यात आले. 

निवेदनाप्रसंगी चाळीसगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद एरंडें, उपाध्यक्ष ॲड.माणिक शेलार, सचिव ॲड. कविता जाधव, ॲड.अविनाश जाधव, ॲड. बोराडे , ॲड. हर्षल राजपूत व ॲड. ऊपासनी आदी उपस्थित होते.

Protected Content