जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी खंडपीठात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केलेला असताना बकाले यांनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केला. त्यावर हरकत दाखल करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी महिलांच्यावतीने वकीलपत्र दाखल करण्यात आले. त्यासाठी न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सत्र न्यायालय जळगाव व खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. तसेच बकाले यांनी गुन्ह्यातील फिर्याद रद्द करण्यासाठी खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यात बकाले यांनी तपासी अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन त्यांना सहकार्य करावे, असे आदेश खंडपीठाने ३० ऑगस्ट रोजी दिले होते. असे असतानादेखील बकाले जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तपासकामी हजर झाले नाही.
तर अटकापूर्व जामीन मिळण्यासाठी पुन्हा जळगावच्या सत्र न्यायालयात २१ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल केला. महिलांसंदर्भात अश्लील संभाषण असलेला हा गुन्हा असल्याने महिलांच्यावतीने हरकत दाखल करण्यासाठी मुदत मिळावी म्हणून बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी ॲड. गोपाळ जळमकर, ॲड. कुणाल पवार यांनी वकीलपत्र दाखल केले. त्या वेळी सर्वबाबी न्यायालयाच्या निर्दर्शनास आणून दिल्या. त्यावर सत्र न्यायाधीश बी.एस. वावरे यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकत दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे आता जळगा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल अटकपूर्व अर्जावर ३१ ऑक्टोबर रोजी युक्तीवाद होणार आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वैशाली महाजन यांनी म्हणणे मांडले.