गिरणा नदीतून वाळूचा उपसा करणारे ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील गिरणा नदीतून अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी बुधवार २५ ऑक्‍टोबर रेाजी दुपारी १ वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फरार अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडी शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता धडक करवाई केली. यात विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरतांना काहीजण दिसून आले. दरम्यान पोलीसांना पाहून अज्ञात ट्रॅक्टर चालक पसार झाला. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पो.कॉ. महेश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहे.

Protected Content