विद्यापीठात छत्रपती शिवरायांवरील डिप्लोमा कोर्स सुरु करा : कुणाल पवार यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात देखील  छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महानगर सचिव अॅड.  कुणाल पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव भूषण भदाणे यांनी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांना इमेलद्वारे  केली आहे.   

 

इमेलचा आशय असा की, सावियत्रीबाई फुले पुणे विद्यापिठात छत्रपती शिवरायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने देखील छत्रपती शिवारायांवर डिप्लोमा कोर्स सुरु करावा.  जेणेकरुन छत्रपती शिवरांयांची  युद्धनिती, महाराजांचे प्रशासक म्हणुन असलेले कार्य, त्यांनी राबवालेल्या कल्याणकारी योजना त्या काळात अर्थ व्यवस्था कशी मजबूत ठेवली गेली.  स्वराज्य स्थापनेसाठी राबवलेले युद्धनितीतील बारकावे या सर्व विषयी अभ्यासक्रम राबवावा.  विद्यापीठला एका खासदारांनी दिलेली शिष्यवृत्तीची रक्कम देखील पाडून आहे, कारण त्यासाठी विद्यार्थी उपलब्ध नाही असे माहिती अधिकारात उत्तर दिले आहे.  त्यामुळे पुणे विद्यापीठाचा चांगला आदर्श आपल्या विद्यापीठने देखील घ्यावा जेणे करून शिवाजी महाराज यांच्या जीवन शैलीचे अनुकरण ह्या माध्यमातून विद्यार्थी करतील. याबाबत  तत्काळ निर्णय घेवून विध्यार्थी वर्गास सदर अभ्यासक्रम सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महानगर सचिव अॅड. कुणाल पवार व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव भूषण भदाणे यांनी केली आहे.

 

Protected Content