रावेर ग्रामीणमध्ये पोवणे तीन लाख नागरीकांची तपासणी : बिडिओ दिपाली कोतवाल

रावेर प्रतिनिधी । शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत रावेर तालुक्यात आरोग्य विभागातर्फे प्रत्येक घराचे व कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात ५२१ जणांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ७० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर सर्वेक्षणात विविध प्रकारच्या व्याधी असलेले ७३७६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ३३२७ रुग्ण उच्च रक्तदाबाचे असून २८४२जणांना मधुमेह असल्याचे दिसून आल्याची माहिती गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिली 

 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात २८ एप्रिल ते २मे पर्यंत माझे ‘कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली होती. तालुक्यातील ऐनपूर, चिनावल खिरोदा, लोहारा, निंभोरा, थोरगव्हान, वाघोड या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्फे १२१ गावात ही मोहीम राबविण्यात आली.  प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण करण्यासाठी ३६७ टीम तयार करून यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती.

पावणे तीन लाख नागरिकांची तपासणी

या अभियानंतर्ग तालुक्यातील २ लाख ७७ हजार २३३नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९६२६ घरांना, चिनावल केंद्रांतर्गत ९११५ ,खिरोदा ५४७४, लोहारा ५४३७,निंभोरा ८०३०, थोरगव्हान ७३७५,  वाघोड ९९६०, सावदा ३९८६, व रावेर ३२५१ असे एकूण ६२२५४ घरांना  सर्वेक्षण करणाऱ्या पथकाने भेटी दिल्या आहेत . त्यातील २ लाख ७७ हजार २३३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे

 

Protected Content