भाजपचेही उमेदवार निश्चित!

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहा जागांतून शिवसेनेने कोल्हापुरातील उमेदवार दिला आहे. भाजपदेखील कोल्हापुरातूनच उमेदवार देणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा याच्याकडून नाव निश्चित होणार आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत, त्यामुळे यावेळी राज्यसभेसाठी चुरस आहे.

राज्यसभेतील सहा जागांची मुदत जून नंतर संपत आहे. या सहा जागांच्या नामांकनासाठी ३१ मे अखेरची मुदत असून साठी १० जूनला निवडणूक आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे उमेदवार निश्चित झाले असून भाजपकडूनही उमेदवार निश्चिती केली जात आहे. यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे नाव निश्चित असून कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपकडे ११३ आमदार यात भाजपचे १०६, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ तर महाविकास आघाडीचे १६९ आमदार आहेत. या संख्याबळानुसार भाजपचे दोन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे ५ उमेदवार निवडून जाऊ शकतात.
या सहाव्या जागेसाठी भाजपला तिसऱ्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी केवळ १३ मतांची आवश्यकता आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना १२, राष्ट्रवादी १३ आणि काँग्रेस ३ या मतांची बेरीज केल्यास त्यांना १३ मताची आवश्यकता आहे.

Protected Content