कोरोना महामारी निर्मूलन तसेच पावसासाठी फैजपुरात महापूजा

फैजपूर (प्रतिनिधी) आज श्रावणी पौर्णिमा,रक्षाबंधन आणि श्रावण सोमवार असल्याने तसेच आलेली कोरोना महामारी जावी तसेच पाऊस पडावा, या प्रांजल हेतूने श्री स्वामिनारायण मंदिर फैजपूर येथे महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी भक्तिकिशोरदास शास्त्री यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. या महापूजेचा लाभ मंदिराचे सचिव सुधाकर चौधरी आणि प्रमोद भंगाळे यांनी घेतला पूजेच्या दर्शनासाठी मंदिराचे कोठारी मधुकर फिरके व विश्वस्त पी डी पाटील,के आर चौधरी तसेच डॉ गणेश भारंबे , एम एम टळेले, दिलीप वारके , पंडीत भंगाळे उपस्थित होते संपूर्ण महापूजेची तयारी सत्यप्रकाश स्वामी आणि प्रशांत गाजरे यांनी केली

Protected Content