रामाचा मिशा असलेला फोटो आणि मूर्ती असावी : संभाजी भिडे

सांगली (वृत्तसंस्था) अयोध्येत राम मंदिर उभारणी हा मांगल्याचा आनंदाचा सण आहे. हा दिवस देशभरातील हिंदूंनी दसरा आणि दिवाळी सारखा आनंद उत्सव करावा. तर यापुढे रामाचा फोटो, मूर्तीमध्ये मिशा असलेला असावा, असे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

 

 

संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद म्हणाले, साधू संत, महंत, नेते अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ५ ऑगस्ट रोजी एकत्र येत आहेत. त्यामुळे राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दिवाळी-दसऱ्याप्रमाणे साजरा करावा. कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये तथ्य नाही. ठाकरे म्हणजे तेजस्वी, त्यांचे ऑनलाईन भूमिपूजनाचे विधान बाळासाहेबांनाही आवडले नसते. रामाचा मिशा असलेला फोटो आणि मूर्ती असावी. तसेच आजचे आयडॉल हे नटनट्याऐवजी शिवछत्रपती, श्रीराम, श्रीकृष्ण हे असावेत. तर सुशांत सिंह राजपूतने लफडेबाजीतून आत्महत्या केली असावी, असे संभाजी भिडे म्हणाले. कोरोनामध्ये तथ्य नाही, लॉकडाऊनमुळे लोकांना मुरगाळून टाकले आहे. सोशल डिस्टनसिंग पाळू नये, देशातील नेत्यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा आहे. ५ ऑगस्टला रामजन्मभूमी उत्सव हा दसरा-दिवाळीसारखा साजरा करा, असेही भिडे म्हणाले.

Protected Content