वाकोद शिवारात तिघांना बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाकोद शिवारात शेतात काम करणाऱ्या तीन जणांना काहीही कारण नसतांना बेदम मारहाण करत महिलेचा विनयभंग केला तर गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत तोडून नेली. याप्रकरणी पहूर पोलीसात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, संतोषी अजय शर्मा (वय-३४) रा. पुणे ह.मु. वाकोद ता. जामनेर हे त्यांच्या मालकीच्या वाकोद शिवारातील गट नंबर ११५ मध्ये शेतात भाऊ मयुर रामप्रसाद शर्मा आणि आई मंगलाबाई रामप्रसाद शर्मा हे शेतात मशागतीचे काम करत असतांना काहीही कारण नसतांना अजय रामराव पांढरे, अमोल रामराव पांढरे, संजय आनंदा निकाळजे,, संगिताबाई रामराव पांढरे आणि दिपा अजय पांढरे रा. वाकोद यांनी शिवीगाळ व मारहाण करून संतोषी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत लंपास केली. याप्रकरणी संतोषी शर्मा यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीसात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी भरत काकडे करीत आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.