पाचोऱ्याच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात

पाचोरा, प्रतिनिधी । येथील शंभू नगरातील ६८ वर्षीय आजीबाईंचा  सिटी स्कोर २५, ऑक्सीजन लेव्हल ७० आणि १०० टक्के कोविड निमोनियाने बाधीत असतांना त्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २० दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत होऊन सुखरुप घरी परतल्या आहेत. 

 

शंभू नगरातील जिजाबाई गायकवाड यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात व नंतर  गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृती सुधारत नसल्याने त्यांचे पोलिस कर्मचारी असलेले पुत्र रवींद्र गायकवाड यांनी त्यांना पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. त्यांचा सिटी स्कोर २५, ऑक्सीजन लेव्हल ७० व १०० टक्के कोविड निमोनियाने ग्रस्त अशा अवस्थेत डॉ. स्वप्नील पाटील यांनी गायकवाड कुटुंबियांना दिलासा देत जिजाबाईंवर शर्थीचे उपचार केले.  २० दिवसांच्या उपचारानंतर जिजाबाई ठणठणीत होऊन सुखरुप घरी परतल्या आहेत. त्यांचे सुखरूप घरी परतणे त्यांना मिळालेले नवीन जीवन मानले जात असून त्यांचा डॉ. स्वप्नील पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर गायकवाड कुटुंबीयांनी डॉ. स्वप्नील पाटील यांचे मनापासून कौतुक करत आभार मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.