किरकोळ कारणावरून तिघांना बेदम मारहाण; एकावर तिक्ष्ण हत्याराने वार

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाज मंदीर रिकामे करण्याच्या कारणावरून आठ जणांनी महिला व तिच्या मुलीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली तर महिलेच्या दिरावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सुनिताबाई किरण भालेराव (वय-४२) रा. हिंगोणा ता. यावल ह्या पती, मुलगी आणि मुलासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी घराचा सामान गावातील जुने समाज मंदीरात समाजाच्या परवानगीने गेल्या चार महिन्यांपासून राहत आहे. रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी विवाहितेचे पती बाहेरगावी कामासाठी गेले होते त्यावेळी घरात विवाहिता व तिचे दोन्ही मुले घरी होते. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास गावातील काही तरूणांनी येवून म्हणाले की, तुम्ही राहत असलेले समाज मंदीर खाली करा तिथे बाबासाहेबांची मुर्ती ठेवायची आहे असे सांगितले. त्यावर विवाहितेने उद्या सकाळी १० वाजता आम्ही आमचे घराचे सामान काढून मंदीर खाली करतो असे सांगितल्याने तरूण तिथून निघून गेले. दरम्यान सायंकाळी ७ वाजता गावातील समाजाचे चेतन वसंत तायडे, अनिकेत वसंत तायडे, आकाश विनोद तायडे, अजय विनोद तायडे, सुर्यभान भागवत तायडे, सुनिता वसंत तायडे, प्रविण चरण तायउे आणि प्रशांत भागवत तायडे सर्व रा. हिंगोणा ता. यावल हे एकत्र येवून समाज मंदीर आत्ताच्या आत्ता खाली करा असे बोलून शिवीगाळ केली. विवाहितेन समजविण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनी अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली व संसारोपयोगी वस्तू बाहेर फेकून नुकसान केले. त्यावेळी विवाहितेची मुलगी भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्याने तिला देखील शिवीगाळ करून मारहाण करून गैरवर्तन केले. दरम्यान विवाहितेचा दीर रणजित रमेश भालेराव हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्यावर चेतन तायडे, अनिकेत तायडे, सुर्यभान तायडे आणि प्रविण तायडे यांनी हातातील तिक्ष्ण हत्याराने कपाळावर, हातापायावर वार करून गंभीर जखमी केले. गावातील काही नागरीकांनी येवून भांडणातून सोडवासोडव केली. जखमी झालेले रणजित भालेराव यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. विवाहिता सुनिता भालेराव यांनी यावल पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी  चेतन वसंत तायडे, अनिकेत वसंत तायडे, आकाश विनोद तायडे, अजय विनोद तायडे, सुर्यभान भागवत तायडे, सुनिता वसंत तायडे, प्रविण चरण तायउे आणि प्रशांत भागवत तायडे सर्व रा. हिंगोणा ता. यावल यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे करीत आहे.

Protected Content