Home धर्म-समाज भाजपा काहीही म्हणू शकतो.

भाजपा काहीही म्हणू शकतो.

0
53


मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – जेम्स लेन च्या मुलाखतीवर भाजपा काहीही म्हणू शकतो. त्यांच्या म्हणण्यावर राज्य चाललेलं नाही. कायद्याचं राज्य आहे आणि त्यानुसारच चालेल असे खा. संजय राऊत यांनी प्रत्तुत्तर दिले आहे.

राज्यात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु असून राज ठाकरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद निर्माण झाला आहे.  तर आता गुढीपाडवा सभेत राज ठाकरे यांनी आरोप केल्यानंतर जेम्स लेनने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे.

यावर, भाजपाचे आ. अतुल भातळखकर यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीची लिंक शेअर करीत शरद पवारांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. पवारांनी महाराष्ट्रात विनाकारण पेटवापेटवी आणि सातत्याने शिवशाहिरांबाबत गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागतील का? असा प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला असून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हावी, असे भातखळकरानी म्हटल्यावर, भाजपा काहीही म्हणू शकतो. त्यांच्या म्हणण्यावर राज्य चाललेलं नाही. कायद्याचं राज्य आहे आणि त्यानुसारच चालेल, असा टोला खा. राउत यांनी लगावला आहे.

 

 

 


Protected Content

Play sound