Home Cities जळगाव भाजपतर्फे सामाजिक न्याय पंधरवडा अंतर्गत स्वच्छता अभियानास प्रारंभ

भाजपतर्फे सामाजिक न्याय पंधरवडा अंतर्गत स्वच्छता अभियानास प्रारंभ

0
43


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | “सामाजिक न्याय पंधरवाडा” अंतर्गत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे ९ मंडलात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याअभियानास श्यामाप्रसाद उद्यान येथे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजु मामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ करण्यात आला.

 

स्वच्छता अभियानात श्यामाप्रसाद उद्यान येथे  संत भास्कर जुनागडे यांनी गाडगेबाबा याच्या वेशभूषेत सहभाग घेतला. याप्रसंगी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, अभियान प्रमुख नगरसेवक राजेंद्र मराठे, नगरसेवक महेश चौधरी, जिल्हा चिटणीस राहुल वाघ, अनुसूचित आघाडी अध्यक्ष लता बाविस्कर, मालती जुनागडे, रिक्षा आघाडी अध्यक्ष प्रमोद वाणी, आघाडी अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, प्रसिद्ध प्रमुख धिरज वर्मा आदी उपस्थित होते. यासोबत शिवाजीनगर मंडळातर्फे शिवाजीनगर परिसर मंडळ क्रमांक १ मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी मंडल अध्यक्ष रमेश जोगी, नगरसेवक राजेंद्र मराठे जिल्हा चिटणीस राहुल वाघ , मंडळ सरचिटणीस शांताराम गावडे, संजय शिंदे, ज्योतीताई राजपूत ,संजय सोनवणे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश रोहित, श्याम प्रसाद शुक्ला व कर्मचारी उपस्थित होते. यासह सर्व मंडळामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound