भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील दीनदयाल नगल परिसरात मोकळ्या जागेत हातात लोखंडी सुरा घेऊन दहशत माजविणाऱ्या एकाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता अटक केली आहे. याप्रकरणी पहाटे ३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश गोकुळसिंग जोहरी रा. दीनदयाल नगर भुसावळ असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील हॉटेल हेवनच्या मागील भागात असलेल्या दीनदयाल नगर परिसरात संशयित आरोपी गिरीश जोहरी हा सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री १ वाजता हातात लोखंडी सुरा घेऊन दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाले. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी गिरीश गोकुळसिंग जोहरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४ इंची लांब असलेला लोखंडी सुरा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गिरीश जोहरी यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर हे करीत आहे.