भाजपचा माझ्या अटकेचा रडीचा डाव; आव्हान स्वीकारल्याचे प्रताप सरनाईकांचे प्रत्युत्तर

ठाणे वृत्तसंस्था । ‘भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून माझ्या अटकेचा खेळ रचला आहे. पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी तयार आहे,’ असं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठणकावलं आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. कंगनाला संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे,’ असं सरनाईक म्हणाले होते. तो मुद्दा उचलून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी सरनाईक यांच्या वक्तव्याची स्वत:हून दखल घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी तसं पत्रही लिहिलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या या भूमिकेमुळं सरनाईक भडकले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या या तत्परतेमागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘. ‘मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसानं रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही,’ असंही त्यांनी ठणकावलं आहे.

Protected Content