वाहनावरील जीएसटीत लवकरच कपात – जावडेकर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आपण वाहनावरील जीएसटी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करू, असे अवजड वाहन उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

लवकरच वाहन क्षेत्रासाठी चांगली बातमी मिळेल. वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआमच्या कार्यक्रमात बोलताना जावडेकर म्हणाले की, वाहन उद्योग अडचणीत असल्याची जाणीव सरकारला आहे. मात्र, हा विषय जीएसटी परिषदेच्या अखत्यारीतील असल्यामुळे आम्हाला पटकन निर्णय घेता येत नाही. त्यामुळे लवकरच जीएसटीत कपात होईल असे त्यांनी सूचित केले. त्याचबरोबर जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण तयार झाले आहे. या दोन मागण्या वाहन कंपन्यांनी बऱ्याच दिवसांपासून लावून धरल्या आहेत. याबाबत सर्व संबंधितांशी तपशिलात चर्चा केली आहे. त्या आधारावर हे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हे धोरण हे लवकरच जाहीर होईल असे जावडेकर म्हणाले.

स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहनावर 28 टक्‍के जीएसटी बरोबर वाटत नाही असे सांगितले आहे. जावडेकर म्हणाले की, जीएसटी कपात करताना प्रथम दुचाकी, नंतर तीनचाकी नंतर सार्वजनिक वाहने आणि नंतर चारचाकी अशा क्रमाने जावे लागेल. या क्षेत्राने देशांतर्गत बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्याबरोबरच निर्यात वाढवावी.

Protected Content