काँग्रेसचे आमदार माधवराव जवळकर यांना कोरोनाची लागण !

नांदेड (वृत्तसंस्था) हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जवळकर हे नांदेड जिल्ह्यातील चौथे कोरोनाबाधित आमदार ठरले असून याआधी काँग्रेसच्याच तीन आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.

 

जवळकर यांच्यावर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. तर नांदेडमधून विधान परिषदेवरील काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही उपचार सुरु आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच मोहन हंबर्डे यांनी कोरोनावर मात केली आहे. तर विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही मुंबईतच उपचार सुरु आहेत. दरम्यान, माधवराव जवळकर हे नांदेड काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. त्यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकी मिळवली.

Protected Content