चिंचखेडा बुद्रुक येथील मेव्हण्याचा शालकाकडून खून; संशयितास अटक

जामनेर प्रतिनिधी । शालक व मेव्हण्यासोबत दारू पित असतांना अचानक मध्यरात्री शालकाने मेव्हण्याचा शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील लहासर फाट्याजवळ घडली. संशयित आरोपी शालक हा स्वत:हून पोलीसांच्या स्वाधिन झाला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भागवत मोतीराम पारधी (वय-३०) रा. चिंचखेडा बु ता.जामनेर हा आपला शालक प्रथमेश आढारे (वय-२२) रा. नेरी बुद्रुक ता.जामनेर हे दोघे बुधवारी रात्री दारू पिण्यासाठी तालुक्यातील बोदवड रोडवर लहासर फाट्याजवळ एकत्र बसले होते. दरम्यान, मध्यरात्री उशीरापर्यंत अचानक शालक प्रथमेश आढारेने आपल्या मेव्हण्यावर शास्त्राने वार करून खून केला. शालकाने मेव्हण्याचा खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडीस आला. खून केल्यानंतर संशयित आरोपी प्रथमेश आढारे हा स्वत:हून पोलीसांच्या स्वाधिन झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामाकरून मृतदेहा जामनेर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे. संशयित आरोपी प्रथमेशची आई ही नेरी बु गावातील ग्रामपंचायत संदस्या आहेत. जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Protected Content