कोरोनाबाधित समजून तरुणीला धावत्या बसमधून फेकले बाहेर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरने एका तरुणीला धावत्या बसमधून फेकून दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे.

 

दिल्लीच्या मंडालवी परिसरात तरुणी राहत होती. कोरोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरने तिला मथुरा टोलनाक्याजवळ धावत्या बसमधून तिला फेकून दिले. ‘मुलीची कोविड १९ चाचणी करण्यात आली होती. तिला दिल्लीतून पाठवण्यात आले होते. तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मुलीला अशक्तपणा आला होता. त्यामुळे ती नीट चालू शकत नव्हती. मात्र, ती करोनाबाधित असल्याचा संशय आल्याने बसचालक आणि कंडक्टरनं तिला धावत्या बसमधून फेकले. खाली पडल्याननतर तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यात तिचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, मुलीला धावत्या बसमधून फेकले त्यावेळी तिच्या आईने तिला वर ओढण्याचे प्रयत्न केले. मात्र, तिला वाचवू शकली नाही.

Protected Content