यावल तालुक्यात आज तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून यावल शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाने पुनश्च विरार नगर मार्गाने प्रवेश केलाय. आजच्या अहवालात नव्याने तीन रूग्ण कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका प्रसिद्ध शासकीय ठेकेदाराच्या दोन मुलांना कोरोना लागण झाल्याचे चाचणी अहवालातून निष्पन्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मागील आठ दिवसापासून करुणा या संसर्गजन्य आजाराने तालुक्यात विविध ठिकाणी मेघाने शिरकाव केला असून यात ग्रामीण परिसरातील साकळी हे गाव बाधित रुग्णांच्या संख्यामध्ये अग्रभागी असून एकट्या साकळी गावात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ७० वर जाऊन ठेवला आहे. दरम्यान आज मिळालेले यावल शहरातील विरारनगर परिसरात राहणारे दोन रुग्ण हे यावल तालुक्यात शासकीय कामे घेणाऱ्या एका ठेकेदाराची असून सदर ठेकेदार हा एका लोकप्रतिनिधींच्या जवळचा नातेवाईक असून त्या प्रतिनिधी चे कुटुंब सध्या कोविंड सेंटरला उपचारार्थ दाखल झाले आहे. दरम्यान मागील 12 तासात यावल तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 264 गेली असून यात 162 रुग्ण हे ग्रामीण भागातील असून तर शंभर रुग्ण शहरी भागातील आहेत यातील ग्रामीण भागातील सत्तर आणि शहरी भागातील 68 असे एकूण 138 रुग्णांना उपचारांची घरी पाठवण्यात आले. यातील 17 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू झालेले असून कोवीड सेंटरला ग्रामीण क्षेत्रातील 85 कोरोना भाजीत रुग्ण आणि शहरी भागातील 24 रुग्ण दाखल करण्यात आले. एतर कूण 109 रुग्ण दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र कुवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, डॉ.मनीषा महाजन यांनी दिली.

Protected Content