राज्यात आता म्युकरमायकोसीसचे इंजेक्शन १२०० रुपयात मिळणार

 

मुंबई : वृत्तसंस्था ।   राज्यात आता म्युकरमायकोसीसचे इंजेक्शन १२०० रुपयात मिळणार . आधी या इंजेक्शनची किंमत ७ हजार रुपये होती

 

वर्धा येथील जेनेटीक लाइफ सायन्स येथे एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शन तयार करण्यास सुरवात केली आहे. हे म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी वापरले जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार याची किंमत प्रत्येकी १,२०० असणार आहे.

 

आज नितीन गडकरींनी ब्लॅक फंगसवरील इजेक्शन बाजारात आणलं आहे. आतापर्यंत सात हजार किंमत असणारं हे इंजेक्शन आता १२०० रुपयात मिळणार आहे. देशात एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनचं उत्पादन आतापर्यंत एकाच कंपनीतर्फे करण्यात येत होतं. आता वर्ध्याच्या जेनेटीक लाइफ सायन्सलादेखील याची निर्मिती करता येणार आहे. सोमवारपासून हे विक्री साठी बाजारात उपलब्ध होणार आहे.

 

म्युकोरमायकोसिस उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनच्या २९,२५० अतिरिक्त कुपी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी दिली होती.

 

देशात कोरोनाचं संकट कमी होत असताना म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसने डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. देशभरात एकूण ११ हजार ७१७ जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रात असल्याचं दिसून आलं आहे.

 

Protected Content