बंद घर फोडून ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ कॉलनी येथे बंद घर फोडून ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना सोमवारी ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जयंत भाईदास शिरसाट (वय-५५, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ४ मार्च रोजी जयंत शिरसाठ त्यांच्या फॅमिलीसह औरंगाबाद येथे खासगी कामासाठी खाजगी वाहनाने निघाले. दरम्यान त्यांचे शेजारी राहणारे कविता पाटील यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तुटलेला असून घरात चोरी झाल्याचे सांगितले. ही घटना घडल्यानंतर जयंत शिरसाठ हे घरी परतले. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरी आल्यावर नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून ४८ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व कानातले कर्णफुले असा मुद्देमाल चोरून दिल्याचे उघडकीला आला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दुपारी जयंत शिरसाठ यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

Protected Content