सेवानिवृत्त कंडक्टरचे बंद घर फोडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लांबविला

जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर शहरातील शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त कंडक्टरचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ३ लाख रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निवजत माधव चौधरी (वय 60, रा. शास्त्रीनगर जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कंडक्टर आहेत. १४ जुलै रोजी त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोकड असा एकूण ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निवजत चौधरी यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

Protected Content