शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरची चोरी; पोलिसात गुन्हा दाखल

धरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स नन्युज प्रतिनिधी ।धरणगाव शहरातील फुलपाट गावाजवळ असलेल्या शाळेसमोरून एका शेतकऱ्याचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी १४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

धरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरी पुंडलिक पाटील (वय-५५, रा. फुलपाट ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर (एमएच  १९ एस ११७) क्रमांकाचे ट्रॅक्टर आहे. हे ट्रॅक्टर त्यांनी शुक्रवारी १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या गावातील शाळेजवळील खळ्यात लावलेले होते. मध्यरात्री जळगाव येथील संदीप पितांबर राजपूत याने काहीही न सांगता हे ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. या संदर्भात ट्रॅक्टर मालक हरी पाटील यांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी संदीप पितांबर राजपूत यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.

Protected Content