मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात इलेक्ट्रिक कारला अच्छे दिन येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज रस्त्यांवर फ्युएल कारसोबतच इलेक्ट्रिक कार देखील धावताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किमतींना कंटाळून ग्राहक देखील इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. यामुळेच EV च्या विक्रीचे आकडे देखील वाढताना दिसत आहे. देशात अनेक ऑटो कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. यातही एमजी कंपनीची एमजी Windsor EV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या कारला एक खास अवॉर्ड मिळाला आहे.
देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक कार एमजी विंडसर ईव्हीला एसर फास्टर अवॉर्ड्स 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले आहे. या कारने टाटा मोटर्स, ह्युंदाई, किआ किंवा इतर कंपन्यांच्या मॉडेल्सना मागे टाकले आहे. यापूर्वी या कारला 2025 चा इंडियन ग्रीन कार ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे. एमजी विंडसर ईव्ही लाँच झाल्यापासून, ही भारतीय मार्केटमध्ये नंबर-1 इलेक्ट्रिक कार राहिली आहे. अलीकडेच कंपनीने 15,000 युनिट्सचा उत्पादन टप्पा ओलांडला. यावेळी कंपनीने सांगितले की विंडसरला दररोज सुमारे 200 बुकिंग मिळत आहेत.
विंडसर ही एमजीची प्रीमियम कार आहे, जी 2024 मध्ये लाँच झाली होती. तुम्ही ही कार ३ व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता. यात 38kWh बॅटरी पॅक आहे, जो 332Km किमीची रेंज देते. या कारमध्ये एकाच FWD मोटरद्वारे 134bhp आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये लेव्हल-2 एडीएएस, रिअर एसी व्हेंट्ससह क्लायमेट कंट्रोल, ड्युअल डिजिटल स्क्रीन, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक भाषांमध्ये नॉइज कंट्रोलर, जिओ अॅप्स आणि कनेक्टिव्हिटी, टीपीएमएस, 6 एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस आणि पूर्ण एलईडी लाईट आहे. यात एक उत्तम सीटबॅक पर्याय आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.50 लाख रुपयांपासून ते 15.50 लाख रुपयांपर्यंत आहेत. याने त्याच्या सेगमेंटमध्ये टाटा कर्व्ह ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही400 लाही मागे टाकले.
विंडसर ईव्ही तीन व्हेरियंटमध्ये येते, ज्यामध्ये बेस (एक्साइट), मिड (एक्सक्लुझिव्ह) आणि टॉप (एसेन्स) यांचा समावेश आहे. यापैकी, एक्साईटला 15%, एक्सक्लुझिव्हला 60% आणि एसेन्सला 25% मागणी आहे. त्याच वेळी, कंपनीने या कारसोबत बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅन देखील सादर केले आहे. अशा परिस्थितीत, फक्त 10% लोकांनी बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनसह ही कार बुक केली आहे. उर्वरित 90% लोकांनी बॅटरी असलेली कार बुक केली आहे.