रावेरमध्ये सिंधी समाजाच्या वतीने झुलेलाल जयंती उत्साहात

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात सिंधी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात झुलेलाल जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी मोटरसायकल रॅलीने उत्सवाची सुरुवात झाली, तर संध्याकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

झुलेलाल जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी रावेर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयासमोरील भगवान झुलेलाल महाराजांच्या मंदिरात विधीवत पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिमय झाले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, अध्यक्ष दिलीप तोलानी, मोतीराम खटवाणी, राजेश जेस्वानी, उपाध्यक्ष दीपक रेवतानी, दीपक मानवानी, राजेश जैसवानी, सुनिल जयसिंघानी, सुधामा जयसिंघानी, महेश जयसिंघानी, पवन सुखवानी, धनराज चंदवानी, किशोर तोलानी, लखन तलरेजा, हितेश मखीजा, अंकित चंदवानी, जीतू कोटवानी, जवाहर चंदवानी, रोहित रामचंदानी, मनीष तोलानी, रूपेश मनवानी, बबलू खानचंदानी आदींसह मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधव उपस्थित होते. उत्साहात पार पडलेल्या या जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

Protected Content