जळगाव तालुक्यातून तेरा वर्षीय मुलाचे अपहरण !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील एका भागात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलगा हा बिस्कीट घेवून येतो असे सांगून अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २१ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलगा हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १९ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिस्कीटचा पुडा घेवून येतो असे सांगून तो घरातून कुठेतरी निघून गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांसह पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतू त्याच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्याच्या पालकांनी शनिवारी २१ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.