जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गोदावरी कॉलेज परिसरातून अवैधपणे पिकअप वाहनातून वाळू वाहतूक करणाऱ्या चालकावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी शनिवारी २१ जून रोजी सकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी कॉलेज परिसरांमधून पिकअप वाहनातून अवैधपणे चोरी वाळू होत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी २१ जून रोजी पहाटे ४.३० वाजता कारवाई करत पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ०३३१) वर कारवाई केली. यावर चालक भास्कर हरी कोळी (वय-४२, रा. दिनकर नगर, जळगाव) याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानुसार पोलिसांनी वाहन जप्त केले आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप वाहन चालक भास्कर कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. संजीव मोरे करीत आहे.