जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नूतन वर्षा कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये जिन्याखालील बाजूस असलेल्या सेफ्टीडोअरचे कुलूप तोडून ४० हजार रूपये किंमतीच्या ईन्वहरर्टरच्या दोन बॅटऱ्या चोरुन नेल्या. ही घटना शनिवारी १५ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास समोर आली. हा प्रकार अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत गुरूवारी २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नूतन वर्षा कॉलनीत गोविंद विष्णू मराठे हे चटई व्यापारी वास्तावस असून त्यांचे मालकीचे चार मजली अपार्टमेंट आहे. याठिकाणी दैनंदिन लाईट जात असल्यामुळे त्यांनी अपार्टमेंटच्या जिन्याखाली सेफ्टी डोअर लावून तीन ईन्व्हरर्टरच्या मोठ्या बॅटरी लावल्या आहेत. ९ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अपार्टमेंटमध्ये राहणारे दैनंदिन कामात व्यस्त असल्याने कोणतरी अज्ञात इसम अपार्टमेंटमध्ये शिरले. त्यांनी सेफटी डोअरचे कुलूप तोडून १९ हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरुन नेली. त्यानंतर पुन्हा शनिवारी १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास त्याच ठिकाणाहून चोरट्याने २१ हजार रुपयांची दुसरी बॅटरी देखील चोरुन नेली. चोरी करतांनाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्या फुटेजवरुन बॅटरी चोरुन ती बॅटरी चारचाकी वाहनातून घेवून जाणाऱ्या चौघांना पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेतले. ते चौघ उच्चशिक्षीत असून त्यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहे.