यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील प्रसिद्ध श्री बालाजी रथोत्सवाच्या मार्गावरील खड्डे डांबरीकरणाने बुजवावेत, अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वाखाली यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना देण्यात आले आहे.
१२ एप्रिल २०२५ रोजी श्री बालाजी रथोत्सव होणार आहे. रथोत्सवाच्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नगरपरिषदेने माती मिश्रित कच टाकून तात्पुरती डागडुजी न करता, डांबरीकरणाने खड्डे बुजवावेत. बेहेडे सुपर शॉपी ते नगरपरिषद रस्ता, मेन रोड ते बोरावल गेट-देशमुख वाडा-वाचनालय-विठ्ठल मंदिर ते नगरपरिषद या मार्गावरील खड्डे आठ दिवसांत बुजवावेत.
जर खड्डे आठ दिवसांत बुजवले गेले नाहीत, तर शिवसेना तीव्र आंदोलन, उपोषण किंवा धरणे आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, शरद कोळी, पप्पू जोशी, योगेश चौधरी, योगेश राजपूत, प्रकाश वाघ, पिंटू कुंभार, विजू कुंभार, डॉ. विवेक अडकमोल, सुनील बारी, हुसेन तडवी, अझहर खाटीक, प्रवीण लोणारी आदींनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत. यावल शहरातील श्री बालाजी रथोत्सव हा शेकडो वर्षांची परंपरा असलेला आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या रथोत्सवाच्या मार्गावरील खड्ड्यांमुळे भाविकांना आणि रथाला अनेक अडचणी येतात. त्यामुळे, नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.