सुप्रिम कॉलनीतून तरूणाचा मोबाईल लांबविणारा चोरटा जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या तरूणाचा १४ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरी झाला होता. या गुन्ह्यातील एकाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप भादा करोचे (वय 20) रा. धामणी मध्यप्रदेश, ह.मु. पालीस कॉलनी वसाहत, सुप्रिम कॉलनी येथे राहतो. गेल्या सहा महिन्यांपासून कामाच्या निमित्ताने जळगावात राहत आहे. उन्हाळ्याचा उकाडा जाणवत असल्याने 15 मार्च रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपला होता. त्यावेळी मोबाईल चार्जीगला लावला होता. दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत घेत अज्ञात चोरट्यांनी 14 हजार रुपये किंमतीचा रेडमी मोबाईल हँडसेट चोरून नेला. सायंकाळी मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले.  याप्रकरणी प्रदीप करोचे  यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हादाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंद सिंग पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील, मुदस्सर काझी, सतीश गर्जे यांनी कारवाई करत संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याला राहत्या घरातून सोमवार २२ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

Protected Content