वैयक्तिक वादातून गोळीबार; संशयित आरोपी पसार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पुणे शहरातील येरवडा भागात हॉटेलमध्ये पैशांची मागणी करत पैसे दिले नाही म्हणून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १७ एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या अग्रसेन हायस्कूलसमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये काही सराईत गुन्हेगार शिरले होते. हॉटेल चालक विकी चंडालिया याला त्यांनी पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयित आरोपी आकाश चंडालिया याने विकीच्या दिशेने पिस्तूलाने गोळीबार केला. यात दोन गोळ्या झाडण्यात आल्य. तर त्याचे साथीदार यांनी विकीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील दिली.

याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया, अक्षय सतीश चंडालिया, अमन सतीश चंडालिया, अभिषेक शाम चंडालिया ( सर्वजण रा. रेंजहिल्स,पुणे ), सुशांत प्रकाश कांबळे( रा. पर्णकुटी सोसायटी येरवडा ), संदेश संतोष जाधव, संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर येरवडा ) यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैयक्तिक वादातून गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींवर पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस हद्दीत गुन्हे दाखल आहेत.

यापरिसरात वारंवार होत असलेल्या गोळीबार संदर्भात अग्रसेन हायस्कूल समोरील या हॉटेलबाबत यापूर्वी नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. या परिसरात लुटमार तसेच दहशत निर्माण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content