चार किलो गांजासह तरूणाला अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पनवेल भागातील कळंबोली परिसरात १ लाख रूपये किंमतीचा ४ किलो गांजा बाळगणाऱ्या एकाला पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई नवीमुंबई पोलीस दलाच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी दिनेश जाधव वय ३४ रा. आसूडगाव याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, नवी मुंबई पोलीसांना गांजा या अंमलीपदार्थ घेऊन एक व्यक्ती कळंबोली स्टील बाजाराच्या रस्त्यावर येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत संशयित आरोपी दिनेश जाधव याला अटक केली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कोकरे, पोलीस उपनिरिक्षक मंगेश बाचकर, पोलीस हवालदार रमेश तायडे व इतर पोलीसांनी केली आहे. संशयीताच्या हातामधील पिशवीची झडती घेतल्यावर त्यामध्ये ४ किलो आढळून आला आहे. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content