मानियार बिरादरीच्या कार्यालयात दांगडो; सामांनाची तोडफोड, एक जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रथ चौक येथील मानियार बिरादरीच्या कार्यालयात कौटुंबिक वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असतांना अचानकपणे मुलाकडील नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयातील दांगडो करून कार्यालयाचे काचेच्या दरवाजाची तोडफोड करण्यात आल्याची घटना बुधवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी अद्याप शनीपेठ पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

जळगाव शहरातील रथ चौकात जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे कार्यालय आहे. या कार्यालयात समाजाचे कौटुंबिक वाद सोडविण्यात येतात. यात मुलाकडील व मुलीकडील नातेवाईकांनी बोलावून सुरू असलेला वाद मिटविण्यात येतो. असाच प्रकार बुधवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी नगरातील शेख जावेद शेख याज मोहम्मद आणि त्यांची पत्नी सुमैय्याबी यांच्या कौटुंबिक वाद आहेत. कौंटुंबिक वाद मिटविण्यासाठी शेख जावेद याने रथ चौकात जळगाव जिल्हा मानियार बिरादरीत पत्नीपासून विभक्त होण्यासह इतर तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार यापुर्वी दोन सुनावणी झाल्या होत्या. दरम्यान, बुधवारी ३० ऑगस्ट रोजी कौटुंबिक वादाची तिसरी तारीख होती. मानियार बिरादरीच्या पंचानी दोन्ही सदस्यांसह त्यांच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कार्यालयात दोन्हीकडील नातेवाईकांशी बोलणी सुरू असतांना काही तरूणांनी कार्यालयाबाहेर गोंधळ घालून कार्यालयाचे दरवाजाचे काम तोडून टाकले. यात एकाच्या पायाला दुखापत झाली. मानियार बिरादरीच्या सदस्यांनी तातडीने शनीपेठ पोलीसांना घटनेची माहिती कळविली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतल दोन्ही कुटुंबातील एकुण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीचे काम सुरू आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content