फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, “यावल तालुक्यातील एका गावात राहणारी ३१ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी रोजी महिलेच्या मोबाईलवर गोपाळ हरीचंद्र इंगळे याने फोन केला. त्यानंतर त्याने अश्लिल शब्द बोलून विवाहितेचा विनयभंग केला. त्यानंतर काही वेळीनंतर गोपाळची पत्नी रंजना गोपाळ इंगळे हिने महिलेच्या मोबाईलच्या व्हॉटस्ॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून सोशल मीडियात बदनामी केली. तसेच गोपाळ याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याला कंटाळून महिलेने मंगळवारी, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून गोपाळ हरीचंद्र इंगळे आणि रंगना गोपाळ इंगळे यांच्या विरोधात फैजपूर पोलीसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देवीदास सुरदास करीत आहे.