भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचालक जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सुभाष जयराम पाटील (वय-५०) रा. चिंचोली ता.जि.जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे (एमएच १९ व्ही ९३२१ ) क्रमांकाची रिक्षा असून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ७ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चिंचोली गावातील बसस्थानकाजवळ प्रवासी सोडल्यानंतर ते रिक्षाने घरी जात असतांना जळगाव ते औरंगाबाद राष्ट्रीय मार्गावर भरधाव कार (एमएच १२ एनयू ८४८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक सुभाष पाटील हे जखमी झाले. त्यांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सोमवार ८ मे रोजी दुपारी सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफ्फुर तडवी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!