जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचा निषेध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामदेव बाबा यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ काँग्रेस भवनासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्यावतीने शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता रामदेव बाबा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद सुरु असतानाच आता बाबा रामदेव बाबा यांनी हे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यासारखे त्यांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केले. बाबा रामदेव यांच्यावर या प्रकरणी महिला आयोगाने रामदेव बाबांना नोटिस पाठवली आहे. दरम्यान रामदेव बाबा यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील काँग्रेस कमिटी महिला आघाडीच्या वतीने जिल्हा काँग्रेस भवनासमोर शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता निषेध करत रामदेवबाबा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अरूणा पाटील, राहूल मोरे, ॲड. शेळके, प्रतिभा मोरे, कल्पना वानखेडे, आश्विनी राठोड, कल्पना तायडे, एश्वर्या राठोड, मिरा सोनवणे, मिना जावळे, जगदीश गाढे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content